
पोलीस स्टेशन ऊमरखेड जिल्हा यवतमाळ येथे दिनांक ०२/०८/२०२४ रोजी फिर्यादी नामे गौतमकुमार गजेन्द्रप्रसाद सिंह, प्रोजेक्टर मॅनेजर, गावर कंन्सट्रक्शन सदभाव कैम्प सध्दभावना कॅम्प महागांव रोड उमरखेड, रा. सिमरी, ता. सकरा, जि. मजफ्फरनगर, राज्य विहार यांनी रिपोर्ट दिला की, त्याचे कब्जातील दुरुस्त/नादुरुस्त वाहने व ईतर असा एकूण १,६०,००,०००/- रु. चा मुददेमाल यातील आरोपी नं. १ व २ यांनी त्याचे आर्थीक फायद्यासाठी विक्री केले व सदरचा मुददेमाल विक्री करण्यास सहकार्य केले अश्या आशयाचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन ऊमरखेड येथे अपराध क्रर्माक ४६२/२०२५ कलम ३०३ (२), ३(७) प्रमाणे एकुण ०४ आरोपीत इसमा विरुध्द गुन्हा दाखल करुन तपासावर घेण्यात आला.सदर गुन्ह्याचे तपासात घटना ठिकाणचे घटनेवेळीचे जाणारे-येणारे मार्गावरिल सिसिटीव्ही फुटेज पडताळणी करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी नंदु बळीराम राठोड, वय ४९ वर्षे, रा. डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, ऊमरखेड ता. ऊमरखेड जि. यवतमाळ, दर्शन संतोष भंडारी, वय ३० वर्षे रा. फॅक्टरी वॉर्ड ऊमरखेड, लखन धनसिंग जाधव, वय २२ वर्षे रा. कौडगाव ता महागांव, प्रकाश संतोष वानखेडे, वय २७वर्षे रा. नागचौक, ऊमरखेड,
शेख आबेद शेख युनुस, वय ३० वर्षे, रा. डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, ऊमरखेड यांना दि. १३.०८.२०२७ रोजी अटक करुन सदर अटक आरोपी यांचा मा. प्रथम वर्ग न्यायालय, ऊमरखेड यांनी दि. १६.०८.२०२७ रोजी पावेतो पोलीस कस्टडी घेवुन गुन्ह्यात वापरलेली दोन क्रेन व आरोपी याने चोरुन नेलेल्या हिन्दुस्थान लोडर, कॉम्प्रेशर, मोटार व मशीन, ०३ पटटे असा एकुण ६७,९०,०००/-रु. चा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयात आजपावेतो २,२७,९०,०००/- रु.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद गुन्हयातील फरार ईतर आरोपी यांचा शोध घेवून अटक करणेकामी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पुसद येथील गुन्हे तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे मागील ८ दिवसापासुन ऊमरखेड पो.स्टे.ला तळ ठोकुन बसले आहे. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन वि.जे. साहेब व तपास पथक पोउपनि रवी चव्हाण, पोहेकॉ/६९८ सुनिल मदने, पोहेकौं / धम्मानंद केवटे व पोकों/२०६६ गजानन जाधव यांनी उत्कृष्ट कामगीरी केली.