
उमरखेड कार्यालयाच्या वतीने बुधवार दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी भूमापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.भूमी अभिलेख विभाग काळानुरूप आधुनिकतेकडे वाटचाल करीत असून त्यानुसार मोजणी, फेरफार, नक्कल प्रक्रिया या बाबीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आले आहे. फेरफार अर्ज व आपले सरकारअंतर्गत नक्कलसाठी अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने भूमी अभिलेख विभागामध्ये स्वीकारण्यात येत आहेत. यानुसार अर्जदार यांना त्यांच्या अर्जाबाबतची अचूक माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने भूमापन दिनाचे औचित्य साधून बुधवारी जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानुसार सामान्य जनतेला भूमी अभिलेख विभागामार्फत होणाऱ्या आधुनिकतेबाबत माहिती देण्यात येणार आहे याकरिता नागरिकांनी उपस्थित राहून माहिती प्राप्त करून घ्यावी,असे आवाहन भूमी अभिलेख कार्यालय उमरखेड अतिरिक्त उपअधीक्षक अशोक राठोड व मुख्यालय सहाय्यक एस.डी.मस्के यांनी केले आहे.