
स्थानिक आठवडी बाजार परिसरात मध्यरात्री भीषण गैंगवार घडून एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान मारहाण झाली असून, त्यात शेख अजहर शेख अकबर रा. अब्दुल रहमान कॉलनी, उमरखेड या युवकाचा निर्वृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना ८ जूनच्या मध्यरात्री च्या सुमारास घडली.
उमरखेडमधील दर्गा परिसरात आठवडी बाजारात जुन्या वादाचे रुपांतर हिंसक झटापटीत झाले. आरोपींनी मृतक अजहर याच्यावर लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी मानेवर, पोटावर आणि पाठीवर जबर मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्याला उमरखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मृतकाचा भाऊ खालिद शेख अकबर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,काही दिवसांपूर्वी ताजपूरा भागात दोन्ही गटांत वाद झाला होता. याच वादाच्या पार्श्वभूमीवर ८ जूनच्या रात्री आठवडी बाजार परिसरात पुन्हा दोन गटात हाणामारी झाली.
या घटनेमुळे उमरखेड शहरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने उमरखेड पोलिसांनी अश्या प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसविणे पोलिसांपुढे आव्हान बनले आहे यातील शे मुद्दसीर, शे सोहेल, आणि शे आरीश या तिघांना अटक करण्यात आली सदर तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पि.आय पाडुरंग शिंदे करीत आहे.