
उमरखेड महागाव महामार्ग रोडवर असलेल्या राजस्थान धाब्याजवळ एक इसम ज्याने अंगात काळया रंगाचा शर्ट व काळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केलेला आहे असा इसम गांज्याची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध रित्या गांजा अंमलीपदार्थ घेउन रस्त्याने येत आहे. अशा गोपनिय माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ पो स्टे उमरखेड, पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोहेका/2020 पोशि/879 नोळे 1191 महाळनर, पो.शि/137 दरबस्तेवार, चालक पोकों 2632 रुद्र तसेच वजनकाटेवाले, फोटोग्राफर, दोन सरकारी पंच असे रवाना होवुन सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे गजानन अशोक डहाळे, वय-अं 25 वर्ष, रा. गोचरस्वामी वार्ड, सोनार लाईन, उमरखेड याला ताब्यात घेऊन त्याजवळून गांजा अंमली पदार्थ ज्याचे निव्वळ वजन 2313 ग्रॅम किमंत अंदाजे 20,000/-रुपये प्रति किलो प्रमाणे असा एकुण 46000/- रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ जप्त केला.
सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. उमरखेड, पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पो.हे.का./2020 संदिप ठाकुर, पो.हे.का दिनेश चव्हाण, पो.शि/879 नोळे, पो.शि/1191 महाळनर, पो.शि/137 दरवस्तेवार, चालक पो.का/ 2632 रुद्र यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.