
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतीवृष्टीमुळे उमरखेड व महागाव तालुक्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मानकेश्वर या गावात पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली.पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
या वेळी प्रशासनाला पूरग्रस्त नागरिकांसाठी तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या.
मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी पोहचणं शक्य नसल्याने प्रशासनाला तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या असून पूर्ण प्रशासन फिल्ड वर उतरलं असून जेवढं शक्य होईल तेवढ्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे तरी सर्वांनी धीर धरावा प्रशासन आणि शासन मदतीसाठी तयार असून सगळीकडे भेटी देणे सुरू आहे.
या वेळी सुदर्शन पाटील रावते, कृष्णा पाटील देवसरकर,परमानंद पाटील कदम, योगेश पाटील वानखेडे उपस्थित होते.