
उमरखेड येथील गोचरस्वामी वार्डात हुतात्मा मधुकर दामोदर चौधरी यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी विद्युत रोषणाई नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली त्यासाठी महावितरण कंपनीच्या विद्युत
खांबावरून पुरवठा देण्यात आला तो चालू बंद करण्यासाठी बसवण्यात आलेल्या स्विच बॉक्स उघडा असल्यामुळे विद्युत तारांचा विद्युत प्रवाह स्मारकात आल्यामुळे शॉक लागून २० वर्षीय युवक जखमी झाल्याची घटना दिनांक ३० एप्रिल रोजी घडली .
शेजारी राहणारे हर्षल मगरे वय २० वर्षे या युवकाला त्याचा शॉक लागल्यामुळे तो जवळपास अर्धा तास बेशुद्ध होता. त्यास ताबडतोब रुग्णालयात दाखल केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बेजवाबदारपणा युवकाच्या जीवावर उठला असता अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. संबंधित सप्लाय हा वीज वितरण कंपनीच्या परवानगीने घेतला की नाही याची चौकशी करावी अशी गोचरस्वामी वार्डातील नागरिकाची मागणी आहे. तसेच शहरातील वीज वितरण कंपनीच्या अभियंतांनी याकडे जातीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी नाहीतर वार्डातील रहिवाशांना वेळोवेळी अशा घटनेला सामोरे जाऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा होऊ शकते त्याची गंभीर दखल वीज वितरण कंपनीने व नगरपालिकेने घेणे गरजेचे आहे अशी मागणी गोचर स्वामी वार्डातील रहिवाशाशी करीत आहेत.
घडलेल्या घटने संदर्भात मुख्याधिकारी यांना माहिती दिली मात्र त्यांनी घटनेच्या ठिकाणी येऊन साधी चौकशी सुद्धा केली नसल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत .
चौकट
स्मारकावर विद्यूत रोषणाई किंवा इतर ठिकाणची रोषणाई करतांना बांधकाम करणारे बांधकाम करून मोकळे होतात मात्र देखभालीकडे पूर्णता दुर्लक्ष होतांना दिसत आहे . त्यामधूनच हर्षल मगरे यांना शाँक लागल्याची घटना घडली न प बांधकाम विभागाने त्या बाबत न प विद्युत विभागाला या संदर्भात या अगोदर काहीही सुचना केल्या नाहीत या घटने नंतर आम्ही विज वितरण विभागाला खुले व लोंबकळत असलेल्या विद्यूत तारा तसेच डि पी वरील उघडया तारा व्यवस्थित करण्याच्या सुचना केल्या आहेत
अजय राठोड
न.प. विद्यूत अभियंता उमरखेड