
उमरखेड शहर व तालुक्यामध्ये गुटखा तस्करांनी डोके वर काढत खेड्यापाड्यासह ढाणकी, ब्राह्मणगाव,विडूळ,पोफळी,मुळावा, महागाव,फुलसावंगी,व सर्व ठिकाणच्या पान टपरीवर खुलेआम गुटखा विक्री सुरू असून याकडे अन्न व भेसळ विभाग आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने युवा वर्ग मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या आहारी जाऊन विविध गंभीर आजारांना बळी पडत असल्याचे दिसत असून अनेक तरुणांना मानसिक आजार झाल्याने पालकातून चिंता व्यक्त होत आहे.अनेक नागरिकांना विविध व्यसन असते त्यांना येथे
व्यसनपूर्ती करण्यासाठी अनेक तडीपार यादीतील सभ्य नागरिक सर्व प्रकारच्या वस्तू आणून विक्री करत असून शहराचे नाव लौकिक खराब करत आहेत उमरखेड, ढाणकी सह इतर ठिकाणचे गुटका किंग पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेशातून गुटखा आणून विक्री करत असल्याची अनेकांना माहिती असताना तसेच
अन्न व प्रशासन विभागासह पोलिस याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसतात पोलिसापर्यंत ही माहिती पोहोचूनही पोलीस कारवाई करत नसल्याने आधीच अन्नभेसळ विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा फायदा घेत गुटखा तस्कर खुलेआम गुटखा विक्री करत आहेत.अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी कर्मचारी शहरासह तालुक्यात येऊन किराणा दुकानदाराकडून, व गुटखा माफिया कडून माया गोळा करून चुपचाप निघून जातात तसेच अनेक गुटखा तस्कर ही त्यांच्या संपर्कात असल्याने दोन-तीन महिन्यात गुटख्याचे एक दोन पाकीट विक्री करणाऱ्या छाट छूट विक्रेत्यावर कारवाई करून बातम्या प्रसिद्ध करून घेतात यापलीकडे कायम गुटखा बंद होईल अशी कुठली कारवाई अण्ण भेसळ विभाग आणि पोलीस करत नसल्याची जाणीव गुटखा तस्करांनाही असल्याने त्यांचे मनोबल प्रचंड वाढले असून तक्रारी करणाऱ्यांना धमक्या देणे,खोटे गुन्हे दाखल करणे,असे प्रकार येथे झाल्याने सभ्य नागरिक तक्रारी करण्यास समोर येत नाहीत.पान टपरीवर खुलेआम असणाऱ्या गुटखा खर्रा याविषयी पोलिसांना माहिती विचारली असता हे अन्न व औषधी प्रशासन विभागाचे काम आहे म्हणून मोकळे होतात.
वयोवृद्ध नागरिकासह युवकांचे शरीरात अनेक गंभीर व्याधी निर्माण करणाऱ्या गुटखा, खर्रा, तंबाखू तात्काळ बंद व्हावा यासाठी अन्न व भेसळ विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे गोपनीय कारवाया करत गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी उमरखेड/ महागाव तालुक्यातील नागरिक करीत आहेत.