विजय कदम लोकहित लाईव्ह न्यूज संपादक
दिवाळीनिमित्त ढाणकी शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. फटाका स्टॉलसाठी पोलिस, महापालिका, अग्निशामक दलाची परवानगी आवश्यक असताना ढाणकी शहरात फटाका दुकानदार यांनी विक्रीसाठी परवानगी घेतलेली नसल्याची माहिती आहे
फटाका जास्तीत जास्त साठा व मर्यादा 50 किलो असायला पाहिजे,स्फोटक, ज्वलनशील, पेट्रोलजन्य पदार्थ स्टॉलजवळ ठेवू नये,दुकानावर वाळू, पाण्याच्या बादल्या व अग्निशामक साधने असावीत, 200 लिटर पाणीसाठा असावा फटाका विक्री दुकानासाठी अग्निशामक दल व पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या जिवीताच्या दृष्टिकोनातून नियमावली तयार केली आहे. मात्र, अनेक फटाका दुकानदार या नियमांना पायदळी तुडवत दुकान उभारलेले आहे . शहरासह शासकीय अन्नाधान्य गोडाउन तसेच वर्दळीच्या ठिकाणी आणि तिथेच रस्त्यावर हात गाडीवर गॅस टाकी चा वापर करत खाण्याचे पदार्थ विक्री होते असा ठिकाणी फटाका दुकान उभारण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.तर अनेकांनी किराणा दुकानात फटाकांच्या राजरोसपणे विक्री सुरू केली आहे. यावर पोलिस, महापालिका, अग्निशामक दलानी लक्ष घालून विना परवानगी फटका दुकान व नियमांना पायदळी तुडवनाऱ्या दुकानदाराचा परवाना रद्द करून योग्य ते कार्यवाही करण्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे.