
विजय कदम : (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
ढाणकी येथे झालेल्या अशांतेते मुळे कायदा सुव्यवस्था बिगडल्याने ठाणेदार प्रेम केदार यांची तडका फडकी बद्दली करून यवतमाळ एस.पी. कुमार चिंता यांनी ढाणकी येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमरावती मुकुटबन येथे कार्यरत असलेले संतोष मनवर यांची बिटरगाव ठाणेदार म्हणून नियुक्ती केली.
बिटरगाव ठाणेदार संतोष मनवर यांनी कर्तव्य बजावताच पोलीस कर्मचारी यांची सभा घेत त्यांना कर्तव्य दक्ष राहून कोणत्याही समाजावर अन्याय न होता फक्त गुन्हेगारीवर आळा घालण्याचे निर्देश दिले.
बिटरगाव अंतर्गत येणाऱ्या पत्रकार यांची सभा घेत पत्रकारावर विश्वास टाकत ढाणकी मध्ये शांतता टिकवण्यासाठी काय करता येईल असे सुजाव घेतले. सुजाव घेतानी त्यांनी पत्रकाराला धर्म नसतो पत्रकार हा सत्य लिहिणारा व सत्य बाजू मांडून न्याय देण्याचे काम करतो व तसेच पोलीसाचे आहे असे म्हणाले .
कर्तव्य करताना,गुन्हेगार व व्हाईट कॉलर मध्ये गुन्हेगारी ला प्रोत्साहन देणाऱ्याची गय करणार नसल्याचेही सांगितले .
नवीन ठाणेदार संतोष मनवर यांची ढाणकी येथे नियुक्ती झाल्यामुळे जनता त्यांच्याकडे शांतता राखण्याची अपेक्षा करत आहे.