
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुरली व मुरली तांडा, येथे देशी विदेशी तसेच मोहाची गावठी दारूची विक्री खुलेआम मोठ्या प्रमाणात चालु असून गावात दारूचा अक्षरश: महापूर आला आहे. गावात २४ तास दारूची विक्री होत असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. तसेच अनेक महिलांचा संसार उद्ध्वस्त होत आहे. दारूमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात सापडली असून, गावातील भांडणांचे प्रमाण वाढले आहे. या दारूमुळे गावातील महिलाना दारू पिणाऱ्या पतीकडून खुप त्रास व मारहाण होत आहे.तसेच शाळा हे ज्ञानाचा मंदिर असून या शाळेत दारुडे दारू पिऊन रिकाम्या बाटल्या तिथेच फेकत असून मुलानवर वाईट परिणाम पडत आहे त्यामुळे गावातील दारू कायमस्वरूपी बंद करून विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुरली येथिल सर्व गावकरीची यांनी बिटरगाव ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना केली. यावेळी युवराज भिकू जाधव,रमेश राठोड नाईक, संजय बन्सी राठोड,शंकर उनळे, बबलू चव्हाण,इंदल राठाड,डि एस राठोड,राहुल गौतम कांबळे व वसंता बळीराम राठोड उपस्थित होते.