
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नीत व श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद संचालित कृषी महाविद्यालय उमरखेड, यांच्या वतीने रक्तदान व रक्ताक्षय(अनेमिया) चाचणी शिबिराचे आयोजन व आरोग्य तपासणी शिबिराचे दि.28/12/2024 ला करण्यात आले. विद्यार्थ्यांन मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना व सेवा संस्कार व्हावा, तरुणांकडुन राष्ट्रसेवा घडावी युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे मिळालेल्या निर्देशानुसार *उज्वल भविष्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय सेवा योजना चांगल्या लोकांसाठी** youth for my Bharat youth for digital literacy* या ब्रीद वाक्याखाली विशेष शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालय उमरखेड येथील प्राचार्य डॉ. आर. एम. खान, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व प्राध्यापक श्री. एस. के. चिंतले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री. व्ही. बि. शिंदे. मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुसद येथील तद्द डॉक्टर ची टीम रक्त पिशव्या व आरोग्य तपासणी करीत उपस्थित होते. तसेच राजाराम उत्तरवार कुटीर उपजिल्हा रुग्णालयात, उमरखेड येथील डॉ. अंकिता गाणंजेगावकर व त्यांच्या टीम सह रक्तक्षय तपासणी शिबीर राबिविले या वेळी 40 विदर्थ्यांची व 20 गावकऱ्यांची रक्तक्षयाची तपासणी केली व ऐकून 25 राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थीनी व गावकऱ्यांनी देखील रक्तदान केले. व सोबतच 90 हून अधिक लोकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यक्रम समन्वयक डॉ.संदीप हाडोळे व महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. ग्राम बारा च्या सरपंचा सौ.साधनाताई हरणे , उपसरपंच मा.श्री.नागोराव हरणे तसेच जि.प.शाळा बारा चे मुख्याध्यापक मा.श्री.जी .डी.लखमावाड ,मा.श्री रमेश काळे ( पोलिस पाटील ग्राम बारा.) व कृषि महाविद्यालयाचे सहायक शिक्षक श्री.वाय.एस.वाकोडे , श्री.ए.एस.राऊत श्री.टि.ए.चव्हान. श्री.ए. बी तामसेकर, श्री. के. व्ही.आगे व प्राध्यापिका पल्लवी घोटेकर व शितल गजभिये व इतर शिक्षकगण उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे 40 स्वंयसेवक व ग्राम बाराचे ग्रामवाशी यांची विशेष उपस्थिती लाभली.