
विविध प्रकारच्या बांधकामासाठी रेती आवश्यक आहे तसेच सद्या खूप मोठ्या प्रमाणात घरकुल मंजुर झालेली आहेत.परंतु सद्या शासनाने रेती डेपो देखील सुरू केलेला नाही.याच गोष्टीचा फायदा घेऊन काही वाळू तस्करी करणारे पैनगंगा नदीत हात धुवून घेण्यासाठी सरसावले असून लोकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसै घेवून रेती विकल्या जात आहे आणि लोकांची आर्थिक लूट केल्या जात आहे.सिदंगी येथील दत्ता नारायण हातमोडे यांच्या मालकीचे पैनगंगा नदी पात्रातील रेतीचे विनापरवाना उत्खनन व वाहतूक करणारे टॅक्टर दि. १९ मार्चला रात्री ९:३० वाजता मौजे ब्राम्हणगाव येथे पकडून तहसिल कार्यालय उमरखेड येथे पुढील दंडात्मक कार्यवाही करीता लावण्यात आले आहे. सदरची कार्यवाही उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार राजु सुरडकर यांचे मार्गदर्शनात मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, मंडळ अधिकारी प्रकाश माने, ग्राम महसुल अधिकारी पंजाब सानप व वाहन चालक धम्मपाल कांबळे यांनी केली आहे.