
विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
आपण सर्वांना कळविण्यात आनंद होतो की आपल्या श्री सहस्त्रबाहु चॅरिटेबल ट्रस्ट उमरखेड, जिल्हा यवतमाळ ,महाराष्ट्रट द्वारे *मृत्यू पश्चात अवयव दान नोंदणी* चा अभिनव उपक्रम चालू करण्यात आला आहे .
सध्या 15 समाजसेवकांनी ऑनलाइन नोंदणी करून आपले मृत्यू पश्चात अवयव दान नोंदणी साठी संकल्प केलेला आहे.
समाजातील ईतर बंधू भगिनींना या जगातील मृत्युपश्चात सर्वोच्च सेवा उपक्रमाबद्दल प्रोत्साहित करण्याकरीता, पहिल्या टप्प्यात नोंदणी झालेल्या समाजसेवकांना या ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री नितीनजी भुतडा यांचे शुभ हस्ते अवयव दान नोंदणीचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आज दि. 12/10/24, शनिवार रोजी,’ *दसरा* ‘या पवित्र सणाचा मुहूर्त साधून
श्री नितीन जी भुतडा यांचे निवासस्थानी घेण्यात आला. सचिन जयस्वाल , ऍड जयश्री कलंत्री , व त्यांच्या आई शांताबाई कलंत्री, शाम गायकवाड, ज्ञानेश्वर कुबडे, कृष्णा कुंभकर्ण, भाग्येश चिंचोलकर, स्वप्निल कदम, शिवराज माने, ओंकार कोडगिरवार, प्रथमेश कुबडे, महेश भुसाळे, गणेश बोरकर, स्नेहल तामसकर, मंजुषा कऱ्हे यांनी नोंदणी करून मृत्यू पश्चात अवयव दानाचा संकल्प केला. यानंतर कुणालाही अवयव दान नोंदणीसाठी *विंध्याचल मेडिकल 24 तास सेवा* उमरखेड येथे भेट देऊन अथवा खालील क्रमांकावर फोन करून मोबाईल द्वारे ही नोंदणी करता येईल.
8308791218
8551093412
9860403040