
दिनांक ३०/०६/२०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा समिती तर्फे उपोषण कर्ते श्री गजानन देशमुख, गुलाबराव सुर्यवंशी, विष्णू गोरे, प्रविण देशपांडे हे उपोषण करत असलेल्या स्थळी भेट देउन त्यांनी उपस्थित केलेल्या मागण्या समजुन घेतल्या.
त्यांच्या प्रमुख मागण्या मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारत पेट्रोलीयम यांना शासनाने दिलेल्या मुळ लिज व्यतिरीक्त केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे या बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य बांधकाम विभाग व भुमी अभिलेख विभाग मार्फत रितसर मोजणी करण्यांत आली सदर मोजणीच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग महागांव ते उमरखेड या रोडच्या बाजुला दोन मिटर अतिक्रमण सदर पेट्रोल पंप चालकाने केल्या बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या अधिका-यांनी कळविले.
बांधकाम विभाग व मोजणी विभाग मार्फत केलेल्या मोजणी मध्ये बांधकाम विभागांनी आपल्या हद्दीच्या खुणा कायम करुन घेतल्या व हद्दीच्या खुणा प्रमाणे त्यांनी त्यांची जागा ताब्यात घ्यावी असे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग मार्फत उद्या दिनांक ०१/०७/२०२५ रोजी अतिक्रमण हटविण्याबाबत रितसर नोटीस देउन कायदेशीर मार्गाने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केल्या जाईल.
या बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिका-यांनी आश्वासन दिले. या बाबत सर्व उपोषण कर्ते व कृती समिती यांना माहिती देण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मागील २० वर्षापासून वाढऊन देत असलेली लीज तात्काळ रद्द करण्या बाबतच्या मागणी नुसार पुढील सात दिवसांमध्ये तसा अहवाल तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालया मार्फत मा. जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ यांना पाठविण्यांत येईल व शेवट पर्यत त्याचा पाठपुरावा करण्यांत येईल.
आम्ही करत असलेला उपोषणाला, उपविभागीय अधिकारी उमरखेड, यांनी दिलेल्या पत्रानुसार आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत आहोत..
आम्ही मागील 18/ 06/ 2025 पासून, आमरण उपोषणास बसलो आहे- आमच्या मागण्या प्रमाणे कार्यवाही झाली नाही, तर आम्ही दिनांक 10/7/2025 पासून परत अन्नत्याग करणार आहो.
उपोषणकर्ते _गजानन देशमुख
अध्यक्ष व इतर -श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समिती उमरखेड