विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
उमरखेड :- (दिनांक २१ सप्टेंबर) अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून उपोषण सोडवावे यासह इतर मागण्या संदर्भात उमरखेड येथील सचिन घाडगे, गुणवंत सूर्यवंशी,गोपाल झाडे व जयंत सूर्यवंशी या चार मराठा युवकांनी आज दुपारी २ वाजता उपविभागीय कार्यालयाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आमरण उपोषण सुरू केले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होत आहे.
त्यामुळे त्यांच्या मागण्या शासनाने त्वरित मान्य करून आमरण उपोषण सोडवावे,यवतमाळ येथील जात पडताळणी कार्यालयात कुणबी जाती संदर्भात अनेक प्रकरण दाखल असून त्यांची हेळसांड कार्यालयामार्फत होत आहे ती थांबवून त्वरित जात प्रमाणपत्र देण्यात यावे,
उमरखेड तहसील मध्ये मोडी लिपीच्या नोंदी पाहण्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही ते त्वरित सुरू करण्यात यावे या मागणी संदर्भात मराठा युवक सचिन घाडगे गुणवंत सूर्यवंशी गोपाल झाडे व जयंत सूर्यवंशी यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले असून मराठा युवकांनी अचानक सुरू केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.