
उमरखेड तालुक्यात १५ ते १७ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील ९ महसुल मंडळापैकी ४ महसुल मंडळात १५९.५० मि. मि. इतकी अति वृष्टी आवाक्याच्या बाहेर असल्या कारणाने तसेच इसापूर धरणाचे १५ गेट उघडून विसर्ग पैनगंगा नदी पात्रात सोडल्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे अनेक घरांची पडझड व घरात पाणी घुसून नागरीकांचे आर्थिक नुकसान झाले आहे तेथील शंभर टक्के शेतातील उभी पिके पाण्याखली गेली उर्वरीत उभे पिके सुद्धा कांही दिवसात मुळातून सडणार आहेत त्यामुळे उमरखेड तालुक्यातील कोणत्याही गावात शेतीचे सर्वेक्षण न करता सरसगट शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्याची मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाचे निवेदनातून उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना १८ ऑगस्ट रोजी थेट निवेदन देत केली या वेळी किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर देवसरकर, शेतकरी कष्टकरी संघ अध्यक्ष देवानंद मोरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे उतम बरवड, बालाजी वानखेडे , अॅड राजेश सुरोशे, विनायक कदम, अॅड निरंजन पाईकराव, सुभाष येळणे, अॅड संजय शिंदे, अॅड संजय डोळस, सुनिल चव्हाण, दिनकर देशमुख यांच्या सह ईतर शेतकरी उपस्थित होते मदत देण्यास अधिक वेळ लावण्याचा प्रयत्न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे