
पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्यासाठी स्व. भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक या अभिनव उपक्रमाअंतर्गत ५००० वृक्ष लागवडीचा संकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने या उपक्रमाचा दुसरा टप्पा उमरखेड, विडुळ आणि हरदडा येथे राबवण्यात आला, या वेळी डॉ. महेंद्र कल्याणकर (IAS)
मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांच्या हस्ते हरदडा येथे वृक्ष लागवड करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. विजय माने तसेच विडूळच्या सरपंच वंदनाताई कोत्तेवार, जगदीश धुळे, पंजाबराव भालेराव, पोलिस पाटील गजानन मुलंगे , माजी सभापती प्रयागताई कोत्तेवार, माजी बालकल्याण सभापती छायाताई धुळध्वज, माजी सरपंच विकास मुलंगे, प्रकाश नागरपवाड, अशोक धुळे, कमल हिंगमिरे, कैलासराव आगलावे, डॉ. शिवचरण हिंगमिरे, दतराव मार्लेगावकर, सुनंदाताई जाधव, उत्तमराव बोन्सले, गोपाल इंगोले,
औदुंबर वृक्ष संवर्धन सेवा समिती उमरखेड चे अध्यक्ष दिलीप भंडारे वैभव गोडगिरवार , ज्ञानेश्वर खांडरे, शुभम जवळगावकर, दीपक ठाकरे, वीरेंद्र खंदारे , अशोक मुक्कावार, परसराम पवार, शंकरराव चंद्रवंशी, गुट्टेताई, स्वाती हांडे, अशोक शिरफुले, डॉ. चिंताले, वृक्ष संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमात जिल्हा परिषद मुलांची शाळा विडुळ, तेजमल गांधी कृषी विद्यालय, व भाऊसाहेब माने कृषी तंत्र विद्यालय, ब्राह्मणगाव या तिन्ही शाळेच्या व कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ही वृक्ष लागवड होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद मुलांची शाळा, विडुळ चे शाळा समिती अध्यक्ष अजय धुळे व मुख्याध्यापक साहेबराव माने यांच्या नेतृत्वात करण्यात आले. वृक्षांची लागवड करणं हे नक्कीच सामाजिक कार्य आहे, ते स्वतःच महान सामाजिक कार्यकर्ते ठरतात. त्यांच्या अबोल कष्टांचं कोणतंही मोजमाप नाही; त्यांची सेवा अमूल्य आहे म्हणूनच झाडं लावणं हे एक पवित्र कर्तव्य आहे, तसेच झाडांचं संगोपन करणं, त्यांचं महत्त्व समजून त्यांना सन्मान देणं हे त्याहून मोठं सामाजिक उत्तरदायित्व आहे. हा उपक्रम म्हणजे वृक्ष लाऊन भविष्यासाठी लावलेली हिरवी गुंतवणूक असून, या कार्बन क्रेडिट बँकेत कर्ब ही ठेव असून या ठेवीच्या बदल्यात इंटरेस्ट म्हणून सर्वांना प्राण वायू मिळतो, वृक्ष हे क्षणात एका Co2 रेणू पासून एक कार्बन अनु झाडात डिपॉजीट करून त्या बदल्यात सर्व सजीवांना दुपट ऑक्सिजन (O2) देणारी ही जगातली पहिली नैसर्गिक बँक असल्यामुळे समाजात पर्यावरणपूरक जाणिवा वाढवण्याचे हे एक ठोस पाऊल असल्याचे प्रतिपादन डॉ. विजय माने यांनी या वेळी केले. या कार्यक्रमाचे संचालन सुनील वानखेडे प्रास्ताविक साहेबराव माने तर आभार माधव काळबांडे सर यानी मानले.
एक प्रौढ वृक्ष दररोज सुमारे २३० ते २५० लिटर प्राणवायु निर्माण करून २ ते १० लोकांच्या दैनदिन श्वासोच्छवासा साठी पुरेसा असतो हे एक वैज्ञानिक सत्य आहे.
डॉ. विजयराव माने,
संस्थापक: भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक.