
अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर राहून , शहरातील महिलांच्या अडिअडचणी समजून घेत सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या तसेच शहरातील महिलांच्या न्याय – हक्कासाठी झटणाऱ्या सपना चौधरी यांच्या कार्याची दखल घेत जेष्ठ शिव सैनिक पदाधिकारी यांनी उमरखेड शहर महिला प्रमुख पद देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला सपना चौधरी यांचे समवेत वर्षा वानखेडे व संगिता धाबे उपस्थित होत्या
उमरखेड शहर प्रमुख ॲड संजीव कुमार जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यवतमाळ जिल्हा सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम , शिवसेना तालुका प्रमुख प्रविण पाटील मिराशे , जेष्ठ शिवसैनिक रविकांत रूडे , संदिप ठाकरे , कैलास कदम , अनंतराव अमृते ( बालयोगी ) , ॲड . अजय पाईकराव , बसवेश्वर क्षिरसागर , कृष्णा हिंगमीरे , विनायक मरडकर , कपिल चव्हाण , छोटू शर्मा , दामोदर इंगोले , अमोल सुर्यवंशी आदि शिवसैनिक उपस्थित होते