
यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याच्या अनेक तक्रारी केलेल्या होत्या परंतु त्यांनी संघटित पणे ग्रामसेवक व सरपंच यांचे आम्ही मुख्यालय हजर राहत असल्याचे प्रमाणपत्र जोडून स्वतःला पारदर्शक करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे त्यांच्यावर उभारण्यात आलेली कारवाईची कुऱ्हाड त्यावेळेस थांबलेली होती परंतु आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी आज अचानक प्राथमिक आरोग्य केंद्र विडुळ येथे भेट दिली असता या ठिकाणी कुठलाही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता या ठिकाणी एक सीएचओ महिला पेशंट काढत असलेले दिसले कॅमेरा काढून शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला असता तिने खुर्ची सोडून पळ काढला आणि या ठिकाणचा प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार अशा पद्धतीने चव्हाट्यावर आला वरिष्ठ अधिकारी याची दखल घेऊन वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालय राहण्याची तंबी देतील का असा सवाल नागरिकाकडून विचारला जात आहे.