
oplus_8388608
पो.स्टे. उमरखेड येथे दिनांक ०९/०६/२०२५ रोजी नामे शेख खालीद शेख अकवर, वय-३५वर्षे, जात-मुसलमान व्यवसाय-वेल्डींग वर्क शॉपरा. अब्दुल रहेमान कॉलणी उमरखेड जि. यवतमाळ यांनी तक्रार दिली की, दि.०८/०६/२०२५ रोजी सायंकाळी ताजपुरा वार्डात दोनगटामध्ये भांडण झाले होते. त्यानंतर दोन्ही गटाचे परत दिनांक ०९/०६/२०२५ राजी रात्री ००/०० ते १२/३० वाजता दरम्यान आठवडी बाजार येथे समोरा समोर येउन भांडण झाले. त्या भांडणामध्ये शेख मुदस्सीर शेख जमील, शेख सोहेल शेख जमील रा. ताजपुरा वार्ड उमरखेड, शेख उबेद शेया निसार रा. ताजपुरा वार्ड उमरखेड, व इत्तर सोबतच्या तीन ते चार लोकांनी मिळून फिर्यादी नामे शेख खलीद शेख अकबर याचा भाउ शेख अजहर शेखा अकबर याच्यावर जीवाने मारुन टाकण्याच्या उद्देशाने चाकु तलवार रॉडने वार करुन त्याला गंभीर जख्मी करुन त्याचा खुन केला व तेथुन पळुन गेले वगैरे यरुन फिर्यादी यांनी आरोपी शेख मुदस्सीर शेख जमील, शेख सोहेल शेख जमील, शेखा उबेद शेख निसार, शेख आरीश शेख खतीव य इत्तर सोबतच्या तीनते चार आरोपी यांच्यावर कायदेशीर कार्यावाही होणे साठी पोलीस स्टेशन ला येउन तक्रार दिल्याने पो.स्टे.ला अप.क्र. ४२८/२०२५, कलम-१०३(१)१,१८९(२)१८९ (४), १९१ (२),१९१ (३), १९० भारतीय न्याय संहिता २०२३. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.मा. श्री कुमार चिता सा. पोलीस अधिक्षक सा. यवतमाळ यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे सदर गुन्हयामध्ये हे टोळीव्दारे कृत्य केलेले असल्याचे लक्षात आल्याने त्यांच्या आदेशानुसार यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करावी असे आदेशीत केल्याने पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ पो.स्टे. उमरखेड यांनी गेल्या १० वर्षामध्ये उमरखेड शहरात घडणा-या गुन्हेगारी घटनांच्या अभिलेखाचे अवलोकन केले असता शेख मुदस्सीर शेख जमील, याचे टोळी कडून दहशतीच्या मार्गाचा अवलंब करुन वारंवार संघर्ष होवुन गंभिर गुन्हे घडल्याचे दिसुन आल्याने व टोळीव्दारे संघटीत गुन्हेगारी करुन उमरयोड शहरात आपले वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी व इतर फायदयासाठी वेळोवेळी सर्वसामान्य जनतेमध्ये दहशतीच्या माध्यमातुन भितीचे वातावरण तयार केले होते.
तसेच सदर गुन्हयाचे सखोल तपोसात एकुन १२ आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी 7 आरोपी अटकेत असून 5 आरोपी फरार आहेत नमुद गुन्हयातील प्रमुख सुत्रधार आरोपी टोळी प्रमुख यांचे विरुध्द उपरोक्त खून, खुनाचा प्रयत्न, गैरकायद्याची मंडळी जमवून प्रणघातक हत्यारानिशी सज्ज होउन दंगाकरणे, कट रचुन चिथावणीखोर प्रक्षोभक करणे, गंभीर दुखापत करणे, धार्मिक भावना दुखावने, अल्पवयीन मुलीचा अपहरण करून तिच्यावर लैंगीक आत्याचार करणे, लोकसेवकास त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासुन हमला, बलप्रयोग करणे, संपतीचा नुकसान करणे, लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे, शस्त्र वाळगणं यासारखे अनेक गुन्हे केलेले असल्याये पो.स्टे. उमरखेड येथील अप.क्र. ४२८/२०२५, कलम-१०३ (१),१८९ (२)१८९ (४), १९१ (२),१९१ (३),१९०,६१ (२) भारतीय न्याय संहिता २०२३, सहकलम ४/२५ शस्त्र अधिनियम १९५९, अन्वये च्या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम-१९९९ चे संघटीत गुन्हेगारी कलम समाविष्ठ करणे करीता मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, परिक्षेत्र अमरावती यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असता सदर गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम-१९९९ अंतर्गत कलम समाविष्ठ करण्यायावत परवाणगी मिळाली आहे. त्या अनुषंगाने यापुढील तपास मा. श्री हनुमंत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग उमरखेड यांनी करणेसाठी वरिष्ठांचे आदेश झाले आहेत.सदरची कारवाई मा. श्री कुमार चिता सा. पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री अशोक थोरात सा. अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा. यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सतीश चवरे, स्था.गु.शा. यवतमाळ, ठाणेदार शंकर पांचाळ पो.स्टे. उमरखेड, स.पो.नि. धनराज हाके, पोहया, राहुल गोरे स्था.गु.शा. यवतमाळ, स.पो.नि. आशिय चौधरी, पो.उप.नि, सागर इंगळे यांचे डी.बी. पथक, पोहचा विजय पतंगे, पोहवा, दत्ता पवार, पो.शि. निवृत्ती महानळ, पो.शि. अकुंश दरवस्तेवार पो.स्टे. उमरखेड यांनी पार पाडली.