
उमरखेड येथे उपविभागीय उमरखेड अधिकारी कार्यालयाने एम एच 42 ए क्यू 74 48 मुरमा ने भरलेली हायवा पकडली होती .या गाडीचे पावती बुक सुद्धा जप्त करण्यात आलेले होते .काही कर्मचारी सेटलमेंट करण्याच्या नादात असल्याच्या आमच्या निदर्शनात आले . या प्रकरणात उपविभागीय अधिकारी कार्यालयाने काय कारवाई केली याची चौकशी खुद उपविभागीय अधिकारी मुळे साहेब यांना फोन द्वारे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की *दंड लागेल* पण दंडात्मक कारवाई होण्याच्या अगोदरच गाडी मात्र गायब फरार करण्यात आली .ही फरार झाली गाडी कुणाच्या आदेशाने कुणाच्या सेटलमेंटने फरार झाली किंवा फरार केली याची चौकशी उपविगाभागीय अधिकारी मुळे साहेबांनी करायला पाहिजे कारण उमरखेड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत आणि याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे आणि त्यातच महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी डायरेक्ट कारवाई करण्याच्या सूचना परवाच दिलेला आहेत आणि त्यांच्या सूचनेनंतर सुद्धा अशा पद्धतीने गाडी फरार होणे हे आश्चर्य आहे .दंडात्मक कारवाई होण्याच्या अगोदरच ही गाडी फरार झाली कशी हा शोधाचा विषय आहे.उपविभागीय अधिकारी मुळे साहेब या प्रकरणाची चौकशी करतील का ?