उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी,रिपब्लिकन पार्टी या महायुतीचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करणार असून उमरखेड व महागाव तालुक्यातून हजारो कार्यकर्ते रवाना होणार आहेत. सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे, भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दि 29 ऑक्टोंबर 2024 रोजी राजस्थानी भवन, महागाव रोड उमरखेड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेनंतर राजस्थानी भवन येथून भाजपाचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे यांच्या समर्थनात सकाळी १० वाजता भव्य रॅली निघणार आहे. या रॅलीसाठी उमरखेड महागाव विधानसभेतील सर्व मतदार व सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवाराचे हात बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.