कर्ज वसुली बँकेचा आत्मा होय
प्रकाश पाटील देवसरकर यांचे प्रतिपादन
विजय कदम :-लोकहित लाईव्ह न्युज संपादक
ग्राहकाचे हित सांभाळत असताना कर्ज देणे हे एक नियमित काम असून अर्ज वसूल करणे हा बँकेचा आत्मा आहे सर्व कर्मचाऱ्यांनी सोयाबीन हंगाम आला
अशावेळी कर्ज वसुलीला प्राधान्य देऊन तसेच कामास लागावे असे आव्हान जिजाऊ अर्बन क्रेडिट को -ऑफ सोसायटी -चे अध्यक्ष माझी प्रकाश पाटील देवसरकर यांनी केले
सोसायटी आयोजित वार्षिक आमसभेचे अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते त्यावेळी उपाध्यक्ष अँड संतोष जैन संचालक, प्रकाश नरवाडे सुरेश कदम,महादेव खंदारे, शरद पुरी,मुख्य कार्यकारी अधिकारी पी ए बिचेवार, उपकार्यकारी अधिकारी मयुरी शाहू महाराज देवसरकर, अँड अनिल माने, किशोर वानखेडे, भीमराव पाटील चंद्रवंशी, बंडू पाटील मरसुळकर, व्यवस्थापक बीचेवार, आत्माराम सुरोशे गजानन सुरोशे, रमेश चव्हाण, कृष्णा पाटील, सरकार उपस्थित होते,
पुढे बोलताना प्रकाश पाटील म्हणाले आज 26कोटी च्या ठेवी ही किमया सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून केलेल्या कष्टाचे फलित होय पुढील काळात ह्या ठेवी 35कोटी च्या वर चा टप्पा गाठतील असा मला आत्मविश्वास आहे,
असेही पाटील म्हणाले तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड संतोष जैन, यांनी केली तर सन 2023-2024 चा अहवाल बिचेवार यांनी वाचला,व मंजूर केला,
यावेळी सोसायटीचे सभासद उपस्थित होते संचलन शिरपूले यांनी तर आभार संचालक सुरेश कदम यांनी मांनले