
दि. 31 मे रोजी पार पडलेल्या उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित गटाने ऐतिहासिक सत्ता काबीज केली. या निकालामुळे भाजपाने सहकार क्षेत्रात आपली संघटनात्मक पाळेमुळे मजबूत केल्याचे दिसून येत आहे.यास एकमेव कारण म्हणजे भाजपाचे उमरखेड – महागाव विधानसभेचे सर्वेसर्वा असलेले नितिन भुतडा यांच्या मागील पंधरा वर्षापासून च्या राजकारणातील ‘ बेरजेचे गणित ‘ हे मुख्य घटक असल्याचे मानले जाते.
भाजपाने मागील काही काळापासून उमरखेड विधानसभेमध्ये दोन वेळा उत्तमराव इंगळे व सलग २०१४ पासून तिन आमदार निवडून आणले. यामध्ये माजी आमदार उत्तमराव इंगळे वगळता सलग तिन वेळा आमदारांना उमेदवारी मिळवून देवुन त्यांना सहजतेने निवडून आणण्यात नितिन भुतडा यांच्या ‘ बेरजेच्या गणिताची सिरस्थ भुमीका राहिली आहे. त्यांनी निवडणूकीत कधी विरोधी नेत्यांना उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीने भाजपाकडून झुकवुन घेतले. केवळ विधानसभेत भाजपाचा आमदार आणि विधानसभेतील सर्व सहकारी संस्थेवर विरोधकांची सत्ता असे गणित उमरखेड विधानसभेमध्ये बघावयास मिळायचे. कारण भाजपाला नेता म्हणून चेहराच मिळाला नव्हता केवळ पदाचा उपभोग घेण्यात अनेकांनी धन्यता मानली होती. सहकार क्षेत्रातील निवडणूक न लढविणारा भाजप पक्ष असा शिक्का या अगोदर होता परंतू आपली सहकार क्षेत्रावर पकड राहावी यासाठी पून्हा भाजपा नेते नितिन भुतडा यांनी दोन माजी आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश करून घेतला. हा प्रवेश जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम विदर्भात मोठी भूमिका बजावणाऱ्या किंगमेकरने करवून घेतल्याचे पक्ष नैतृत्वास चांगलेच ज्ञात आहे.
भाजपामध्ये शहरअध्यक्ष पदापासून तर जिल्हा अध्यक्ष पदा पर्यंतच्या भुतडा यांच्या बेरजेच्या गणिताच्या राजकारणातून त्यांनी भाजपाचे संघटन मजबुत केले. प्रत्येक समाजातील घटकास त्यांनी भाजपामध्ये सामावून घेतले त्याचेच फलीत सहकार क्षेत्रात मागील काहि वर्षापासून निवडणूक निकालावरून दिसून येते आहे.
ज्या महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाचा एकही संचालक नव्हता त्या बाजार समितीच्या निवडणूकीत काही काँग्रेस नेते काही राष्ट्रवादी तर काही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेवून पॅनल तयार करून सत्ता मिळविली व सभापती पदी भाजपा कार्यकर्त्यास बसविले. उमरखेड जिनिंग प्रेसिंग सोसायटी मध्ये हाच पॅटर्न वापरून सत्ता काबीज केली तर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पद देखील भाजपा कडेच आहे. नुकत्याच पार पडलेल्या उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर १८ पैकी ११ संचालक हे स्व.वसंतराव नाईक पॅनलच्या माध्यमातून निवडून आणले.
तत्पूर्वी उमरखेड नगर परीषद। पूर्णतः ताब्यात घेत नितीन भुतडा यांनी उमरखेड शहराच्या विकासाकरिता मागील 50 वर्षात मिळाला नसेल येव्हढा घसघशीत निधी खेचुन आणला. त्यामुळे उमरखेड नगरीत नितीन भुतडा यांच्या शब्दाला ‘ रामबाण ‘ महत्व प्राप्त झाले आहे. महागाव नगर पंचायतीमध्ये देखील कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसतांना आणि घरभेदी कारवाया होत असताना विजयश्री खेचून आणला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या ढाणकी नगर पंचायतीमध्ये नितीन भुतडा यांच्या राजकीय कौशल्यामुळे अती अल्पसंख्यांक समाजातून उमदवारी दिलेला उमेदवार देखील बहुमताने अध्यक्षपदी निवडून आला. एकंदरीत भाजपाच्या एकाही आमदाराने यापूर्वी सहकार क्षेत्रातील स्वपक्षाच्या विस्ताराचा विचार केला नसल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना कुठेही स्थान मिळत नव्हते मात्र मागील १५ वर्षापासून भुतडा यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे ढाणकी नगरपंचायतमध्ये, उमरखेड नगरपालिकेमध्ये , महागाव नगरपंचायत मध्ये , कृउबासमध्ये, खविसमध्ये अनेक कार्यकर्त्यांना मनाचे स्थान मिळाले आहे.
त्यामुळे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनीही नितीन भुतडा यांना उमरखेड तालुक्याचाच नव्हेतर यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाचा नेता म्हणून घोषीत केल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्याची प्रचीती ही यावेळीच्या विधानसभा निवडणूकीत आणि पुसद यवतमाळ जिल्हा अध्यक्ष नेमण्यात दिसून आली.
नितीन भुतडा यांनी किसनराव वानखेडे यांना उमेदवारी मिळवून देतांना आपले राजकिय भविष्य पणाला लावले होते. मात्र संघटन कौशल्य आत्मसात असलेल्या भुतडा यांनी जिकरीच्या वेळी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची लढाई म्हणजे विधानसभेतील स्व पक्षाचे नेतेच विरोधात काम करत असताना किसनराव वानखेडे यांना विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडून आणून उमरखेड विधानसभेवर सलग तिसऱ्यांदा भाजपाचा झेंडा रोवून दाखविल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितीन भुतडा यांना दिलेली ‘नेते’ पदाची उपमा खरी ठरली असून दुरदृष्टी, सोक्षमोक्ष कामाची पद्धत असलेला नेता या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातील भाजपास मिळाला आहे. एक कार्यकर्ता ते नेता होण्याच्या भुतडा यांच्या कर्मकठोर कार्याचा गौरव राज्यपातळीवर झाला असून ‘आमदार’ निवडून आणणारा भाजपाचा नेता म्हणून त्यांची ओळख सर्वश्रृत झाली आहे.