
ज्ञानेश्वर वायकुळे
ग्रामीण प्रतिनिधी निंगणुर
उमरखेड तालुक्यातील निंगणुर येथे दिनांक १ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरीत क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.व १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून देखील साजरा केला जातो.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.त्यांनी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणले आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक योजना राबविल्या.त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्रात हरितक्रांती झाली.ज्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढले म्हणूनच त्यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १ जुलै रोजी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.या दिवसी , विविध कृषी प्रदर्शने, चर्चासत्रे आणि वसंतराव नाईक जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.याचेच औचित्य साधून दिनांक १ जुलै रोजी निंगणुर येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत वसंतराव नाईक यांची ११२ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच सुरेश विठ्ठल बरडे यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.तसेच उपसरपंचजाचे सुपुत्र इमरान खान मुरली राठोड़ नइमअली नवाब विजय अडे विनोद भोंगाळे गजानान पुरी सर्व ग्रा.प. सदस्य यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.