तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना नॅचरल शुगर कारखाना जुमानत नाही. ऊस तोड नोंदणी असताना शेतकऱ्यांवर अन्याय करत तालुक्यातील शेतकऱ्यांचा उस तोडीसाठी वेळ मारून नेली जात असल्याच्या तक्रारी जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्या.या तक्रारीची दखल घेत नितीन भुतडा यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह कारखान्यावर धडक दिली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व्यवस्थापनाची कान उघडी केली.येत्या ८ दिवसात व्यवस्थापन सुधारून तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील प्राधान्याने उस तोड करण्याच्या सूचना दिल्या.अन्यथा भाजपा शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही अधिकाऱ्यांची गय करणार नसल्याची तंबी यावेळी नितीन भुतडा यांनी नॅचरल कारखान्याच्या विभागाला दिली.
तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्यांना त्रासाबद्दल हिवरा, सवना,कलगाव ,गुंज ,आंबोडा लेवा ,थार, अनंतवाडी, येथील शेतकऱ्याच्या ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या शेतातील ऊस कायम ठेवून तालुका बाहेरील क्षेत्रातील डिसेंबर मधील तोडणीला सुरुवात केल्यामुळे आर्थिक देवाण-घेवानातूनच कारखाना करत असल्याचे शेतकऱ्यांनी आरोप केला. कारखान्याजवळ यंत्रणा कमी आहे कागदोपत्रीच यंत्रणा दाखवण्यात येत आहे असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.यावर नितीन भुतडा कारखान्याच्या अफलातून कारभारावर कडाडले.आणि त्यांनी कारखान्याच्या करनाम्याचा चांगला समाचार घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार नामदेव ससाने, दीपक आडे रितेश पुरोहित,सुदर्शन रावते अमोल , चिकणे रामजी नाईक, विलास गव्हाणे ,सुरेश आव्हाड , ॲड.गजेंद्र देशमुख , योगेश वाजपेयी ,श्रीधर भवानकर, बालाजी राऊत , सतीश कदम, राजू धोतरकर, कैलास वानखेडे, विजय , लालमन , संतोष पडोळकर, श्रीधर देवसरकर,परमानंद कदम ,आशिष पाटील, वैभव गायकवाड, गजेंद्र जामकर, अमोल भारती ,महेश धोतरकर, शरद पाटील कदम, रणजीत कदम, शंकर राऊत आणि शेकडो ऊस उत्पादक शेतकरी सोबत होते