
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नीत व श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद संचलीत कृषि महाविद्यालय उमरखेड यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन दि.२६/१२/२०२४ ते ०१/०१/२०२५ पर्यंत ग्राम.बारा येथे करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांन मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना व सेवा संस्कार व्हावा, तरुणांकडुन राष्ट्रसेवा घडावी युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे मिळालेल्या निर्देशानुसार *उज्वल भविष्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय सेवा योजना चांगल्या लोकांसाठी** youth for my Bharat youth for digital literacy* या ब्रीद वाक्याखाली विशेष शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून ग्रा.म.बारा येथे नुकताच राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला विनम्र अभिवादन करून व माल्यार्पण करून दिनचर्येला सुरुवात करण्यात आली व शोष खडे व पाटबंधारा बांधला.
सदर कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यक्रम समन्वयक डॉ.संदीप हाडोळे व महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. व कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. ऐ.बी.तामसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोष खडे व पाटबंधारा बांधला. तसेच
पथनाट्याद्वारे गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व व पाणी आडवा पाणी जिरवा रॅलीच्या माध्यमातून घोषणा दिल्या.अशा विविध कार्यक्रमातून सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
या प्रसंगी ग्राम बारा च्या सरपंचा सौ.साधनाताई हरणे , उपसरपंच मा.श्री.नागोराव हरणे तसेच जि.प.शाळा बारा चे मुख्याध्यापक मा.श्री.जी .डी.लखमावाड ,व कृषि महाविद्यालयाचे सहायक शिक्षक श्री.एस.के. चिंतले ,तसेच , श्री.ए.एस.राऊत श्री.टि.ए.चव्हान. श्री.ए. बी तामसेकर व प्राध्यापिका पल्लवी घोटेकर व शितल गजभिये व इतर शिक्षणगण उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे 40 स्वंयसेवक व ग्राम बारा चे ग्रामवाशी यांची विशेष उपस्थिती लाभली.