
सोमवार दिनांक दिनांक 4/8 /2025 रोजी तहसील कार्यालय उमरखेड अंतर्गत महसूल सप्ताह निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज रजस्व अभियान शिबिर अभियानांतर्गत नवीन शिधापत्रिका, दुय्यम शिधा पत्रिका,आधार नोंदणी, राहिलेल्या शेतकरी यांचे फार्मर आयडी काढणे,उत्पन्नाचे प्रमाणपत्र,जातीचे दाखले, नॉन क्रीमीलेयर,सातबारा,वितरण, वारसा,फेरफार, उत्पन्नाचे अहवाल, इत्यादी दाखले देण्यात आले कार्यक्रमाचे वेळी नायब तहसीलदार श्री आकाश करवते, महसूल मंडळ उमरखेडचे मंडळ अधिकारी संजय वाघमारे, ग्राम महसूल अधिकारी गणपती क्षीरसागर,प्रकाश हापसे, अनिकेत शिरसाट, संजय केंद्रे, संतोष खैरनार,महसूल सेवक गोपाळ काळपांडे,वैष्णवी शिंदे, दीक्षा लोमटे, त्यासोबतच पुरवठा विभाग सेतू विभाग कार्यक्रमाच्या वेळी हजर होते एकूण विविध प्रकारच्या सेवांचे 307 दाखले वाटप करण्यात आले,