
ऊस उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे व भाजपा नेते नितीनभाऊ भुतडा यांनी उमरखेड महागाव तालुक्यात कार्यरत साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना धरले धारेवर..
यावेळी उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
●जळीत उसास सुपर करण्याची परवानगी देण्यात यावी.
●जळीत उसास सुद्धा फ़्रेश उसाचा दर लागू करावा.
●ऊस उत्पादकांचा तात्काळ विनाविलंब तोड करून वहन करण्यात यावे
●ऊस उत्पादकांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी उपाय योजना करावी.
●ऊसतोड कामगार पळून गेल्यास त्यांना शेतकरी व वहन करणारे गाडी मालक यांना बसणाऱ्या आर्थिक भुर्दंडाची हमी संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापकी संचालकांनी/MD ने घ्यावी.
●ज्या परिसरात ऊसतोड करणारे हार्वेस्टिंग मशीन आहे,तेथील पूर्ण ऊसतोड झाल्याशिवाय हार्वेस्टिंग मशीन तेथून हलवू नये.
● शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट व तोड वाहतूक ऊस वहन झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत देण्यात यावे.
●कारखाना बंद झाल्यानंतर ऊसतोड वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांचे कमिशन डिपॉझिट एका महिन्याच्या आत देण्यात यावे.
●तोड मशीन/केन हार्वेस्टरची संख्या वाढविण्यात यावी.
ऊस उत्पादकांच्या वरील प्रश्नांबाबत दि.20 जानेवारी 2025 रोजी उमरखेड उपविभागीय अधिकारी यांचे दालनात आयोजित बैठकीत उपस्थित….
1) सुभाष शुगर फॅक्टरी प्रा.लिमिट्स हडसनी ता.हदगाव जि.नांदेड , युनिट क्रमांक– 1
2) भैरवनाथ शुगर प्रा.ली., भाडेतत्व वसंत सहकारी साखर कारखाना,पोफाळी ता.उमरखेड
3) नॅचरल शुगर युनिट क्रमांक 2, गुंज ता.महागाव
4) डेक्कन शुगर फॅक्टरी, बोदेगाव ता.यवतमाळ
5) शिवूर शुगर फॅक्टरी, वाकोडी ता.कळमनुरी जि.हिंगोली, युनिट क्रमांक- 2
6) स्व भाऊराव चव्हाण साखर कारखाना युनिट क्र.2, डोंगरकडा जि.नांदेड
7) टोकाई सह साखर कारखाना, वसमत जि.हिंगोली
इत्यादी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना उमरखेड विधानसभेतील ऊस उत्पादकांना त्रास देणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असा सज्जड दम यावेळी आमदार किसनराव वानखेडे यांनी भरला.