
भारतीय जनता पाटीचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज उमरखेड शहरात कार्यकत्यांना संबोधित करणार असून सदर मेळाव्यात माजी आमदारासह हजारो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असून एका क्लिकवर पंतप्रधान आवास योजनेच्या १४ हजार घरकूल लाभाथ्यांना पहिला हप्ता वितरित होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात आयोजित पत्रकार
परिषदेतून आज दिनांक २१ रोजी दिली.केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या तसेच प्रत्येक सामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली असून उमरखेड तालुकास्तरावर तब्बल १४००० घरकुल लाभार्थ्यांनी बांधकाम सुरूकेले असून याचा पहिला हप्ता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ऑनलाईन एका क्लिकवर वितरित होणार आहे तसेच मागील दहा वर्षापासून केंद्रात भाजपा सत्तेत आहे तर गेल्या साडेसात वर्षात महाराष्ट्रराज्यातही भाजपा सत्तेत आहे. राज्यात विकासाचे व्हिजन ठेवून भाजपा काम करीत आहे भाजपाच्या या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट), शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या
पक्षातील उमरखेड व महागाव तालुक्यातील माजी आमदारासह पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, माजी नगराध्यक्ष, विविध ग्राम पंचायतीचे सदस्य, सरपंच यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. सदर प्रवेशामुळे तालुक्यात भाजपाचा व्याप वाढणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला बळकटी मिळणार असल्याचे ही यावेळी भुतडा म्हणाले.यावेळी सदर पत्रकार परिषदेला आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार नामदेवराव ससाने, एड. जितेंद्र पवार उपस्थित होते.