
उमरखेड तालुक्यातील साखरा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे गुरुवार दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण उपसरपंच सौ नंदाताई गौतम दवणे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तसेच नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे उमरखेड तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील वानखेडे,बाळू पाटील वानखेडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार वानखेडे, अशोक काळे,प्रकाशराव वानखेडे, ज्ञानेश्वर गोरे, बालाजी दवणे, रमेश मामा वानखेडे, काशिनाथ वानखेडे, गौतम दवणे, साईनाथ कृषी सहाय्यक चिद्दरवार मॅडम, नोरलावार सर, पालपवाड सर, सर्व ग्रामपंचायत सदस्य,विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होते