
मंगरूळ कारखान्या प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे
दिनांक ७मे २०२५नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे द्वारे घेण्यात आलेल्या एच एस सी परीक्षा २०२५ यामध्ये स्वर्गी देवराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.५०% टक्के लागला आहे. एकूण विद्यार्थी ३४ असून त्यामध्ये १७ मुली तर २६ मुलं परीक्षेत बसले होते. तर या निकालात पूनम किरण दाभाडेकर ही ७८% टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. तर नम्रता संतोष लखकर हिने ७६.५०% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांकाने बाजी मारली तसेच तृतीय क्रमांकावर दिपाली विठ्ठल जगताप ७१.१७% घेऊन पास श्रेणीत उत्तीर्ण झाली. चौथ्या क्रमांकावर करण रमेश जाधव ७० टक्के घेऊन पास झाला. उर्वरित विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.