विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
लोकप्रतिनिधी आणि पत्रकार हे एका नाण्याच्या दोन बाजू असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्या बरोबरच लोकप्रतिनिधीवर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करतात ती एक समाजसेवाच आहे. त्यामुळे विकासाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते येणाऱ्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात आपल्या समन्वयातूनच मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत हदगाव-हिमायतनगर
विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आ. बाबुराव पाटील कदम कोहळीकर यांनी पत्रकारांशी संवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.वेंकटरमना हायटेक इंग्लिश स्कूल हदगाव येथे नवनिर्वाचित आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने पत्रकारांशी संवाद साथण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना आ. कोहळीकर म्हणाले की, गेल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या कार्यकाळात राजकारण करत असताना प्रसंगी अनेक वेळा आर्थिक अडचर्णीचा सामना करत समाजसेवेचा घेतलेला वसा सोडला नाही. आज सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने व आपल्या पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळे आमदार झालो. मला जाणीव आहे पत्रकार
एक समाजसेवेचे अंग आहे. ते लोकप्रतिनिवर अंकुश ठेवण्याचे काम करतात. मी आज पर्यंत आपणाला काही देऊ शकलो नाही पण माझा पहिला निधी हा आपल्या पत्रकार भवनासाठी असेल, त्याचबरोबर पत्रकारांचा आरोग्य विमा असेल अर्धवेळ पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना व्यवसायासाठी गाळा तसेच राहण्यासाठी म्हाडा योजनेतील घर अशा विविध योजनांचा लाभ पत्रकार बांधवांना देण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नव्हे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढील पाच वर्ष आपल्या समन्वयातूनच विकास साधला जाईल असेही आ. कोळीकर म्हणाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख तसेच गोपाल भाऊ सारडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भास्कर वानखेडे, पांडुरंग कदम, बबन कदम, शिवसेना शहर प्रमुख बबनराव माळोदे, तेजपुंजचे संपादक अरविंद जाधव, अतुल राऊतराव यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.