महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे. यासाठी फळबाग लागवड ही योजना सुरू करण्यात आली होती.
या धरतीवर हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील शेतकऱ्यांनी या फळबाग योजनेचा लाभ घेतला. आणि आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी विविध फळांची झाडे लावली आणि त्यांचे संगोपनही सुरू केले परंतु अनेक महिने लोटले तरीही या योजनेचा अद्यापही मोबदला मिळाला नसल्यामुळे.
पोटा येथील शेतकऱ्यांनी थेट कृषी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना रीतसर निवेदन दिले.
शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या फळबागेची कृषी सहाय्यक तथा संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि तथा मस्टरही निघाले आहे अशी ही कैफियत आपल्या निवेदनात मांडली शेतकऱ्यांना याचा मोबदला अजूनही मिळाला नाही. मागील अनेक दिवसांपासून वाहन
झीजवणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून हेलपाटे मारावे लागत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या
तात्काळ लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावी अशी मागणी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केली. या निवेदनावर गोविंद नारायण कदम,शेख खाजा शेख नासर , यादव तुकाराम जाधव, गजानन देशमुख, बालाजी जाधव, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत