परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची प्रास्ताविक असलेल्या आशयाच्या वास्तूची विटंबना करणाऱ्या नराधमास कठोर कार्यवाही करण्यात यावी. यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आंदोलन पेटले आहे. संपूर्ण या घटनेमुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील समस्त समाज बांधव तथा संविधान प्रेमींनी एक दिवसाचा बंद पाळून सदरील घटनेचा निषेध केला. समस्त समाज बांधवांच्या वतीने आयपीएस अधिकारी तथा डीवायएसपी शफाकत आमना व तालुका दंडाधिकारी यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यांनी निवेदनामध्ये आरोपीला कठोर शासन करून तात्काळ त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि आंबेडकर चळवळीतील तरुणांचे कोंबिंग ऑपरेशन थांबवावे अशी ही मागणी केली. या मागणीची निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना सादर केले. या निषेधाचे प्रास्ताविक कवी रमेश पंडित यांनी केले तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष दारवंडे व सामाजिक कार्यकर्ते दिलीप राठोड यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सकाळपासूनच हिमायतनगर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक श्री. नामदेव मद्दे यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त शहरात सर्वच ठिकाणी तैनात करण्यात आला होता. शहरातील संपूर्ण व्यापारांनी स्वयं स्फूर्तीने आपली प्रतिष्ठाणे बंद करून निषेध व्यक्त केला, हा बंद यशस्वी घडवून आणण्यासाठी रवींद्र भालेराव, अमोल भगत, आशिष भवरे, किशन लोखंडे, विनोद भवरे, धम्मपाल भवरे, समस्त संविधान प्रेमींनी यासाठी पुढाकार घेतला.