
श्री सहस्त्रबाहु चॅरिटेबल ट्रस्ट ही एक सेवाभावी संस्था असून समाजातील दुर्बल घटक जे दुर्धर आजारांनी ग्रस्त आहेत अशा व्यक्तींना मोफत औषोधोपचार पुरवण्याचे काम अविरत करीत आहे. या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री नितीनभाऊ भुतडा यांचा ह्या संस्थेच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काही गरजू व्यक्तींना औषोधोपचाराची मदत करण्यात आली.
♦️ रमेश संभाजी जोगदंड हे मागील अनेक वर्षापासून किडनी विकाराने त्रस्त आहेत. त्यांच्या दोनही किडनी निकामी झाल्याने त्यांना महागडी इंजेक्शन लागत असतात.
♦️अर्जित जयभीम गायकवाड हा ८ वर्षांचा मुलगा असून सिकल सेल अनेमिया ह्या दुर्धर आजाराने ग्रसीत आहे. ह्यांना देखील ह्यावेळी औषोधोपचाराची मदत करण्यात आलेली आहे.
वरील दोनही रुग्णांना तब्बल १० हजार किमतीचे औषध मोफत वाटप करण्यात आले. ही सेवा अशीच अविरत चालू राहणार आहे. मा. सचिनजी जयस्वाल ह्या कार्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात.श्री सहस्रबाहू चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यास सलाम.