*
उमरखेड तालुक्यातील विडुळ गावातील आसमानी सुलतानी संकटात सापडलेल्या व कर्जाचा डोंगर असल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली.
14 सप्टेंबर रोजी शंकर सखाराम गिरी वय 42 या शेतकऱ्याने विडूळ येथे सकाळी ७.30 वा. चे सुमारास शेतात लिंबाच्या झाडाला पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे सदर शेतकऱ्याला केवळ दीड एकर जमीन असल्याची माहिती असून मृतकाच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत शेतीमध्ये सततची नापिकी असल्याने कर्जाचा डोंगर वाढतच गेला तसेच बचत गटाचे त्याने 2 लाख ३० हजाराचे कर्ज उचलले होते त्यामध्ये स्वतंत्र मायक्रो फायनान्स, भारत फायनान्स व बीएसएफ फायनान्स अशा तीन बचत गटाचे कर्ज असल्याचे कळते मृतकाचे शव शासकीय रुग्णालयात प्रेताची उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले असून सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय पांडुरंग शिंदे, जमादार मोहन चाटे,रावसाहेब मस्के, प्रफुल घुसे हे पुढील तपास करीत आहेत.