
नुकतेच स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या ध्येय धोरणांवर तसेच जिल्ह्याचे नेते माजी पालकमंत्री मदन येरावार व यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचे नैतृत्वावर विश्वास ठेवून स्थानिक उबाठा युवा सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी स्थानिक युवासेना शहरप्रमुख गोपाल कलाने यांचे नैतृत्वात दि.25 डिसेंबर रोजी दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नितीन भुतडा यांचे लोटस या निवासस्थानी भाजपात प्रवेश केला.
याप्रसंगी प्रवेशित युवा कार्येकर्त्याना भविष्यकालीन विश्वास देत नितीन भुतडा यांनी प्रवेशित सर्व कार्येकर्ते,पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासित केले.
यावेळी युवासेना उपशहर प्रमुख अविनाश ठाकूर,गोपाल देवकते,शहर संघटक राजू खोपे,विभागप्रमुख सुनील कवडे,अनिल काळबांडे,निखिल सोंगुळकर,विकास बाभुलकर,बाळू आदेवार, दिनेश चव्हाण, कृष्णा कलाने, अनिल वानखेडे, रामचंद्र खर्चे, प्रल्हाद पहुरकर, रवी आव्हाड, लक्ष्मण खर्चे, लक्ष्मण सोनटक्के, भैय्या कापते,अविनाश निकम,गणेश मस्के,शाम दळवी,अंबादास कदम, बालाजी घोडके, सहिल भोकरे,महेश ताकतोडे, स्वानंद डोंगरे,सागर आतेवार,वैष्णव करवाडे,प्रशांत अत्तेवार, बालाजी गव्हाणे,हर्षल मगरे,प्रशांत साखरकर, राहुल सुरोशे, रवी वाघमारे, रामा बरिदे, ज्ञानेश्वर गोरे, अक्षय दळवी, समर्थ चाफले, सोमेश आठवले,सचिन बेंडके, पवन नरवाडे आदींनी भारतीय जनता पक्षात स्वइच्छेने प्रवेश घेतला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष दत्तदिगंबर वानखेडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन रावते पाटील, शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बळवंतराव नाईक, माजी सभापती दिलीप सुरते, माजी जिप सदस्य संदीप हिंगमीरे, ऍड.जितेंद्र पवार, ऍड.अनिल माने,अतुल खंदारे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रवेश सोहळ्याचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार,प्रस्ताविक अजय बेदरकर यानी केले तर आभारप्रदर्शन सुदर्शन रावते यांनी मानले.