
उमरखेड शहरातील गफुरशहा मैदानाचे समोर एका टिनाचे शेडमध्ये कत्तली करिता १५ ते 20 गोवंश घेऊन जात आहे.अशी माहिती पोलीस जमादार नरेंद्र लक्ष्मण पुंड यांना मिळाल्यानंतर पंचनामा करून पोलिसांनी ७ जनावरे ताब्यात घेवून आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले आहे.स्थानिक गफुरशहा मैदाना जवळील टिनाचे शेडमध्ये एकुण ११ बैल पोलिसांना दिसुन आले. त्यावरुन तेथे जमलेले लोकांना सदर बैल कुनाचे आहे असे विचारले असता जमलेल्या लोकापैकी दोघांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ११ बैलापैकी ०४ बैल हे आमचे मालकीचे असल्याबदल सांगीतले व तसेच मालकी हक्का बाबत त्यांनी पावती पोलिसा समोर सादर केल्याने त्या पावत्या पोलिसांनी पशु वैद्यकिय अधिकारी उमरखेड यांचे कडून व्हेरिफाय करुन ४ बैल त्या दोघांचे ताब्यात देवुन उर्वरित ७ बैल हे जागा मालक शेख सलीम शेख गणी यांचे मालकीचे असुन त्यांनी सदर बैल हे कत्तलीचे उद्देशाने टिनपत्राचे शेडमध्ये बाधुन ठेवले आहे. यावरुन ते सातही बैल अंदाजे २,९०,००० रुपयाचा मुद्देमाल मोक्यावर मिळुन आल्याने सातही बैलाची पोलिसांनी पशु वैदयकिय अधीकारी उमरखेड यांचेकडून वैद्रद्यकिय तपासणी करुन सुरक्षेच्या दृष्टीने सातही बैल राजस्थानी गोशाळा चुरमुरा येथे दाखल केले आहे.आरोपी शेख सलीम शेख गणी (४२) रा. पेढी पोखरी ता. महागांव जि. यवतमाळ यांनी वरील सातही बैल हे कतलीच्या उद्देशाने टिनाचे शेडमध्ये आनुन बांधुन ठेवल्याने त्यांचेवर प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५ (ए), ९, ९ (ए) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.