
लग्नासाठी हदगाव येथे दुचाकीवर जात असताना सुकळी (ज . ) उड्डाण पुलाजवळ दुभाजकाला धडक लागून एक ठार तर एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज सकाळी 11 : 30 वाजताचे सुमारास घडली आहे .विलास पुंडलिकराव इंगळे वय अंदाजे 48 वर्षे रा . महागाव असे मृतकाचे नाव असून त्याचे सोबत असलेला मनोज परसराम कदम 36 वर्षे राहणार महागाव असे जखमीचे नाव आहे .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,महागाव येथून हदगाव येथे दुचाकी क्रमांक एम एच 29 बी जे 95 87 हे दोघे लग्नासाठी जात असताना सुकळी (ज . ) उड्डाण पुलाजवळील दुचाकीची दुभाजकाला धडक लागल्याने विलास पुंडलिकराव इंगळे हा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला . तर मनोज कदम यांच्या पायाला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाल्याचे असे प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले .घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळ गाठून शवाविच्छेदनासाठी उमरखेड रुग्णालयात प्रेत हलविले .मृतक हा माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचा मेहुणा असल्याचे कळते .