
निंगनूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर वायकुळे
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील गावागावात विकासाची गंगा वाहू लागली आहे. आपल्या भागामध्ये प्रगतीचा प्रवाह वाहता ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ दिली पाहिजे हे लक्षात घेऊन तथा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामावर प्रभावित होऊन,वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास ठेवून निंगणूर येथील असंख्य नवयुवंकांचा विशेषतः बहुसंख्य मुस्लिम युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.हा पक्षप्रवेश सोहळा आ.श्री किसनरावजी वानखेडे,जिल्हा समन्वयक श्री नितीन भाऊ भुतडा, माजी आमदार श्री प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार श्री विजयरावजी खडसे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री रमेशराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली पार पडला.
तसेच या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती तथा संचालक यांचा सत्कार सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
या वेळी श्री महेशजी काळेश्वरकर, जिन प्रेस अध्यक्ष श्री शिवाजीराव माने,कृ.उ.बा.स.सभापती कृष्णा पाटील देवसरकर,उपसभापती श्रीपाल आडे,जिन प्रेस उपाध्यक्ष श्री जितु पवार,श्री भीमराव पाटील चंद्रवंशी, श्री राधेश्याम भट्टड,श्री विवेक कन्नावार,श्री गजानन देवसरकर, श्री महेश पिंपरवार,श्री रोहित वर्मा,श्री उमेश योगेवार,श्री गाडेकर, श्री अरविंद धबडगे पाटील, श्री धनंजय माने,श्री अंकुश वानखेडे,श्री विश्वास कांबळे,श्री दादाराव गव्हाळे,श्री बाबाराव पंडागळे,श्री विजय पंडागळे, श्री सनम खान,श्री उमेश पंडागळे, श्री बालाजी मुडे,श्री सचिन मुडे,श्री शिवाजी सवळे,श्री सचिन पंडागळे,श्री सचिन राठोड,श्री मुतालीब खान,श्री बाबर खान,श्री शुभम त्रिपाठी,सैय्यद मुद्दु,शंकर राठोड,प्रमोद मुडे,बादल मुडे,सचिन मुडे,ज्ञानेश्वर वायकोळे,विठ्ठल खंदारे,रंगराव वायकुळे,मंगेश राठोड,लक्ष्मण चव्हाण,प्रमानंद राठोड,शंकर आडे,आनंद मुडे,नंदू अवधूत,सतिष पंडागळे,दशरथ पांडे,बालाजी सकरगे,यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.