रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांच्या कार्यावर विश्वास ठेवून उमरखेड तालुक्यातील दिंडाळा सरपंचासह गावातील शेकडो नव तरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा,महेश भाऊ काळेश्वरकर, पवन मेंढे,सुकळीचे प्रभारी सरपंच शिवाजीराव रावते, अमानपूरचे सरपंच बाबुलाल चव्हाण, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख, व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.