
रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी शेतीमध्ये काम करणाऱ्या उमरखेड तालुक्यातील धानोरा येथील शंकर जयंतराव काळे वय वर्ष 38 यांचा सकाळी आठ वाजताच्या दरम्यान शेतामध्ये
विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ पत्नी व दोन मुले आहेत. या घटनेचा पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून प्रेत शवविच्छेदना करिता पाठविले.या घटनेने धानोरा येथे शोककळा पसरली आहे.