
नांदेड -सांगवी येथील क्युरिओसिटी प्रायमरी स्कूल व उज्वल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी निमित्त नागपंचमी सण झोके खेळून उत्साहात साजरा केला.यावेळीशाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना नागपंचमीचे महत्त्व सांगितले व सणाला असणारे सांस्कृतिक महत्त्व समजून सांगताना शाळेच्या संचालिका सौ.आशा खिल्लारे म्हणाल्या की ;यादिवशी वारूळात नाग असतो असे समजून नाग देवतेची पुजा केली जाते त्यानिमित्ताने आपला निसर्गाशी संबंध येतो व हल्ली विज्ञान युगाच्या नावाखाली माणुस दिवसेंदिवस निसर्ग व जमीनीपासून दूर जाताना दिसत आहे असे त्या म्हणाल्या त्या पुढे म्हणाल्या की आपण निसर्गाच्या सान्निध्यात व जमिनीवर आनवाणी चालले पाहिजे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगितले व तसेच क्युरिओसिटी स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुराधा काळे मॅडम यांनी सर्व प्रथम नागपंचमी निमित्त सर्व विद्यार्थी,शिक्षक व पालकांना शुभेच्छा देऊन सर्वाचे आभार मानले झोके खेळून झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांच्या चेहरयावर आनंद दिसून येत होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या शिक्षिका नेहा मिस ;अंजली मिस ;संजना मिस व चवणे मावशी यांनी परिश्रम घेतले.