विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरी ( चातारी ) येथे ब्राह्मणगाव केंद्रातील पहिली शिक्षण परिषद मोठया उत्साहात पार पडली त्यामध्ये मान्यवरांनी विद्यार्थी सुरक्षितता ,परख , महादीप , शिष्यवृती परीक्षा , विद्यार्थी शालेय योजना , अपार आयडी , PAT , अशा अनेक विषयावर आपले भाष्य केले . कार्यक्रमास श्री सतीश दर्शवाड साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उमरखेड . श्री मिलिंद कांबळे साहेब विस्तार अधिकारी शिक्षण .श्री संतोष घुगे साहेब विस्तार अधिकारी केंद्र ब्राह्मणगाव प्राचार्य श्री विष्णू सादुडे श्री तेजमल गांधी विद्यालय ब्राह्मणगाव . श्री प्राचार्य श्री प्रकाश पेंटेवाड श्री शिवाजी विद्यालय चातारी श्री आनंद देशमुख केंद्रप्रमुख केंद्र ब्राम्हणगाव , श्री धोंडू माने अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,श्री आबासाहेब जवरे सर हे या शिक्षण परिषदेस उपस्थित होते.परिषदेत सेवानिवृत्त शिक्षक काळे सर व विजय माने सर यांचा सत्कार करण्यात आला ब्राम्हणगाव केंद्रातील सर्व शाळेचा गुणवत्तापूर्ण आढावा श्री आनंद देशमुख केंद्रप्रमुख यांनी सादर केला . शैक्षणिक परिषदेमध्ये नवीन नवीन शैक्षणिक उपक्रमाचे माहिती ची देवाणघेवाण करण्यात आली . श्री चिन्नू निरंजने सर यांनी शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली . शाळेचे मुख्याध्यापक कैलास कोंडरवाड व सर्व शिक्षकांनी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी मोलाचे कार्य केल्याचे नमुद केले .विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा सतीश दर्शवाड साहेब गटशिक्षणाधिकारी यांनी अपेक्षा व्यक्त केली . कार्यक्रमास ब्राम्हणगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक हजर होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कैलास कोंडरवाड , सहय्यक शिक्षक अवित राठोड , घनश्याम सुगमवाड ,सुरेश गिते यांनी परिश्रम घेतले. मिनाक्षी सुगमवार यांनी काढलेली सुंदर व आकर्षक रांगोळी लक्षवेधक ठरली.मुलींनी सुंदर स्वागत गीत गायले . कार्यक्रमाचे संचालन श्री सुरेश गीते सर व आभार प्रगटन घनश्याम सुगमवाड यांनी केले .