चातारी येथे स्वर्गीय लोकनेते
गोपीनाथरावजी मुंडे यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी
दिनांक 12 डिसेंबर रोजी चातारी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी यावेळी चातारी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करण्यात आला त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नियोजित जागेचे भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत भगवान बाबा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी बापूराव माने सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ रंजना माने खरेदी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष कल्याणराव माने किसनराव खांडरे रामभाऊ हामंद माजी सरपंच भगवान माने डॉक्टर सतीश हामंद इत्यादी मान्यवर होते या कार्यक्रमाचे आयोजन चातारी येथील गोपीनाथरावजी मुंडे समितीच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी समितीचे सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक आशा वर्कर अंगणवाडी सेविका तसेच मोठ्या प्रमाणात युवक वर्ग व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते