
बालाजी शिरल्लु यांनी
आजपर्यंत केलेल्या समाज संघटनेतील कार्याची दखल घेउन मा.श्री, विजय दिगांबरावजी देवडे (लहानकर) प्रदेश अध्यक्ष स्वाभिमानी कुंभार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य यांनी ब्राह्मणगाव येथील बालाजी शिरल्लु यांची यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आपण स्वाभिमानी कुंभार समाज सामाजीक संस्थेने प्रदेश स्तरावरून दिलेल्या सुचनांचे पालन करून कार्य करावे व संघटनेच्या सर्व नियम व अटी पाळाव्यात आणि समाज संघटनेच्या ध्येय धोरणानुसार समाजातील सर्व कुंभार समाज घटकांना सोबत घेऊन संघटनेच्या सर्व मिटिंग व सामाजिक कार्यक्रमास वेळोवेळी उपस्थित राहुन समाजाचे मनोबल उंच करावे अशी प्रतिक्रिया प्रदेश अध्यक्ष विजय देवडे यांनी यावेळी व्यक्त केली. व बालाजी शिरल्लु यांची यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड करून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कुंभार समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.