
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे
बुधवार दिनांक १६ जुलै २०२५ रोजी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरी समोर परस्पर दुचाकी एक मेकास धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी असल्याने यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय राज्य महामार्ग नागपूर तुळजापूर मार्गावरील हिवरी समोर एक कीलो मीटर अंतरावर दुचाकी क्रमांक . एम. एच.२९ सी. इ.५४८१ एक्टिवा विरुद्ध दिशेने येत असता, त्यावरील प्रकाश हरिभाऊ वाघाडे वय 58 राहणार हिवरी तालुका जिल्हा यवतमाळ तर यवतमाळ कडून आर्णी कडे जाणारी दुसरी मोटर सायकल एम. एच .३७ ऐन ५२७२ सतीश रोहिदास शिंदे वय ४० राहणार फाळेगाव तालुका मंगरूळपीर हा गंभीर जख्मी असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार चालू आहेत हे अपघात सायंकाळी ७.३० वाजता घडला .प्रकाष हरिभाऊ वाघाडे यांच्या मागे पत्नी दोन मुली ऐक मुलगा असा आप्त परिवार असून या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिस तपास करत आहे.