
27 फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० वाजता मौजा बोरी चातारी ता उमरखेड येथून रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडून कार्यवाही करण्यात आली. सदर वाहन बोरी येथील कामाजी श्रीराम माने यांचे असून रेती तस्करी करतांना रात्रीच्या वेळी पकडल्याने या भागातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी श्री सखाराम मुळे व तहसीलदार श्री आर यु सुरडकर यांच मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, ग्राम महसूल अधिकारी पंजाब सानप,अक्षय शिंदे यांनी कार्यवाही करून रेतीचे वाहन तहसील कार्यालय उमरखेड येथे लावण्यात आले आहे.राजरोसपणे होणाऱ्या रेती तस्करी करणाऱ्यांचे सद्या धाबे दणाणले असले तरीही चटावलेले हे रेती तस्कर जास्त काळ शांत नराहता पुन्हा रेती तस्कर करणारच हे वास्तव आहे.उमरखेड महसुल प्रशासनातील सिंघम म्हणून ओळख निर्माण झालेल्या मंडळ अधिकारी श्री सूरोशे यांच्यामुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्या पुष्पाराज मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर महसूल प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केल्याशिवाय रेती तस्करी मधील पुष्पाराज थांबणार नाही एवढे मात्र खरे आहे.