
उमरखेड येथे भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक व माजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त 7 मार्च ते 9 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 मार्च 2025 रोजी श्री नितीन भाऊ भुतडा यांचे लोटस निवासस्थान नाथ नगर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.व 11:00 वाजता भव्य क्रिकेटचे खुले सामने जिल्हा परिषद मुलांची शाळा पुसद रोड येथे आयोजित केले आहे.आणि संध्याकाळी 6:00 वाजता बंग
लेआऊट महागाव रोड उमरखेड या ठिकाणी आदरणीय नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सांस्कृतिक क्रीडा महोत्सव व अभिष्टचिंतन सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिचा महाकला अविष्कार गीत संगीत पारंपारिक नृत्याचा संगम सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला हास्य सम्राट तथा सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर,व समूह, सुप्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र,सुप्रसिद्ध गायक राहुल सक्सेना, प्रमुख आकर्षण बनले आहे. चला हवा येऊ द्या या हास्यरंगाचा सोहळा आयोजित केला आहे. 8 व , 9 मार्च 2025 रोजी भव्य दोन दिवशीय बॅडमिंटन स्पर्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उमरखेड येथे आयोजित केली आहे. व 9 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या सहकार्यातून भव्य आरोग्य महाशिबिर मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया, या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला मेडिसिन तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ,स्त्रीरोग तज्ञ,बालरोग तज्ञ,कान नाक घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मुखरोग तज्ञ, अशा विविध आजारांची तपासणी उपचार व शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये केल्या जाणार आहे.तरी उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन भारतीय जनता पार्टी उमरखेड च्या वतीने करण्यात आले आहे.